आत्ताची सर्वात मोठी बातमी जुन्या वाहनांना टोल टॅक्स देण्याची गरज नाही नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय 

 

 

 

 

Toll tax free नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले की देशभरात मल्टी-लेन फ्री फ्लो इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू होणार असून वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही.मुंबई: आता टोल नाक्यावर फास्ट टॅग असेल तरीसुद्धा तो स्कॅन होईपर्यंत एक मिनिटं का असेना थांबावं तर लागतंच, फास्टॅग स्कॅन झाल्यानंतरच पुढे जाता येतं. मात्र आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज लागणार नाही. देशभरात इलेक्ट्रिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू केली जाणार आहेयाचा फायदा ट्रॅफिक न होणं आणि वेळ वाचवण्यासाठी होणार आहे. टोलनाक्यावर होणारं ट्रॅफिक वगळण्यासाठी प्रवास सुरळीत सुरू राहावा यासाठी केला जाणार आहे. पुढच्या एक वर्षात संपूर्ण टोलनाक्यांचं रुपडं बदललं जाईल अशी आशा आहे.

 

 

सध्याची सिस्टीम हटवण्यात येणार असून, लवकरच एक नवीन इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम देशभरात लागू केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. या नवीन सिस्टीममुळे वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची अजिबात गरज भासणार नाही.

 

गडकरी यांनी सांगितले की, नवीन इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम १० ठिकाणी सुरू करण्यात आली असून, पुढील एका वर्षाच्या आत ही संपूर्ण देशभरात लागू केली जाईल. या नवीन सिस्टीमचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे टोल नाक्यांवर होणारी वाहनांची गर्दी आणि थांबणे पूर्णपणे संपणार आहे. प्रवासादरम्यान वाहनांचा वेळ वाचणार असून, इंधनाची बचत होण्यास मदत मिळेल.

 

सरकारने टोल वसुली अधिक सोपी आणि विनाअडथळा करण्यासाठी मल्टी-लेन फ्री फ्लो इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशनचा वापर करण्यात आला आहे. वाहनांच्या नंबर प्लेटची आपोआप ओळख पटवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने टोलची प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होईल. या तंत्रज्ञानाचाही वापर टोल वसुलीसाठी करण्यात येणार आहे. या नवीन सिस्टीममुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्याची अपेक्षा आहे.

 

 

सन २०२६च्या अखेरपर्यंत देशभरात उपग्रह तसेच एआयवर आधारित टोलसंकलन प्रणाली कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे प्रवाशांची टोलनाक्यावरील प्रतीक्षा पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. या प्रणालीमुळे दीड हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल, सरकारी महसुलात सहा हजार कोटी रुपयांची भर पडेल, असे ते म्हणाले.

 

 

प्रश्नोत्तरांच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. टोलवसुलीची कार्यक्षमता वाढवणे आणि वाहनांची वाहतूक अखंड सुरू ठेवणे यांसाठी सरकारने ‘मल्टी-लेन फ्री फ्लो टोल’ (एमएलएफएफ) इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एआयद्वारे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आणि (एएनपीआर) आरएफआयडी-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (फास्टॅग) यांचा एकत्र वापर केला

 

 

नऊ टोलनाक्यांच्या स्थलांतराचा विचार करा

 

 

दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील वायुप्रदूषणाची गंभीर दखल घेत, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अनेक निर्देश जारी केले. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी दिल्लीच्या सीमेवरील नऊ टोलनाके तात्पुरते बंद किंवा स्थलांतरित करण्यावर एका आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच दिल्ली महापालिकेला दिले.

 

 

आपल्या आधीच्या आदेशात सुधारणा करून, भारत स्टेज-४ उत्सर्जन मानकांची पूर्तता न करणाऱ्या जुन्या वाहनांविरुद्ध कारवाईची परवानगी न्यायालयाने दिली. सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाल्या बागची, विपुल एम. पंचोली यांच्या पीठाने हे निर्देश दिले. न्या.

Leave a Comment