Maharashtra SSC Exam 2026: महाराष्ट्र एसएससी (इयत्ता 10वी) लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेतली जाणार आहे. हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचं, वाचा सविस्तर माहिती..राज्यामध्ये मधल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या संकटामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागत होत्या. दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना
राज्यामध्ये मधल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या संकटामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागत होत्या. दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या वर्षीच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये (Board Exam) प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थाना दहा मिनिटे वाढवून मिळणार आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेत बदल झाला आहे. या आधी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डच्या परीक्षेला प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी वाचण्यासाठी दिली जात होती. यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने निर्धारित वेळेच्या आधी १० मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याचा नियम हा बोर्डाने रद्द केला आहे.
विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे असे पालकांचं मत आहे.त्यामुळे पेपरच्या आधी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत दिली जात असे तो नियम रद्द केल्याने पेपरच्या नंतर १० मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी पालकांनी केली होती. त्या नंतर हि मागणी मान्य करण्यात आली होती. या संदर्भात बोर्डाने वेळापत्रकामध्ये सुधारणा केली. आणि त्यानुसार निर्धारित वेळेनुसार १० मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे बोर्डाने याबाबत परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे .दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यासाठी बोर्डाने परीक्षेच्या वेळेमध्ये बदल केले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 19 जानेवारी रोजी एसएससी (इयत्ता 10वी) हॉल तिकीट 2026 जाहीर केले आहे. महाराष्ट्र एसएससी लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान पार पडणार आहे. mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना वितरित केले जाऊ शकते. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. शाळेकडून दिलेल्या हॉल तिकीटवर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का असेल
इयत्ता दहावीचे हॉल तिकीट 2026 कसे डाउनलोड
- करायचे| Steps To Download Maharashtra SSC Hall Ticket 2026
- 1. अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in ला भेट द्या
- 2. Latest Notifications सेक्शनमधील SSC या लिंकवर क्लिक करा
- 3. खाली स्क्रोल करून “Login for Institute” हा पर्याय निवडा
- 4. SSC सेक्शनखालील “Sign in Here” वर क्लिक करा
- 5. युजरनेम (Username) आणि पासवर्ड सबमिट करा
- 6. रोल नंबरची श्रेणी निवडा आणि एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करा
- 7. हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा
Maharashtra SSC Hall Ticket 2026: त्रुटी (एरर) असल्यास काय करावे (Maharashtra SSC Hall Ticket 2026: What To Do In Case Of An Error)
विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव किंवा जन्मतारीख यासारख्या वैयक्तिक माहितीत काही चूक असल्यास संबंधित शाळेने निर्धारित शुल्क भरून “Application Correction” लिंकद्वारे ऑनलाइन दुरुस्ती अर्ज सादर करावा.विभागीय मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्त केलेले महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट “Correction Admit Card” या पर्यायाद्वारे उपलब्ध करून दिले जाईल.विषय किंवा शिक्षणाच्या माध्यमाशी संबंधित बदल थेट विभागीय मंडळाकडे कळवावे. महाराष्ट्र एसएससी प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असल्यास शाळेने योग्य फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी तसेच शिक्का मारून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
सीबीएसई माध्यमिक (10th) आणि वरिष्ठ माध्यमिक (12th) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 3 मार्च रोजी होणाऱ्या दोन्ही वर्गांच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. सीबीएसईने त्यांच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर या माहितीसंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.
सीबीएसई परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
विद्यार्थी आणि पालकांच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, 3 मार्च 2026 रोजी होणारी दहावीची परीक्षा आता 11 मार्च 2026 रोजी होईल, तर 3 मार्च रोजी होणारी बारावीची परीक्षा आता 10 एप्रिल 2026 रोजी होईल. आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, दहावीचा तिबेटी; जर्मन; नॅशनल कॅडेट कॉर्प्स; भोटी; लिंबू; लेपचा; कर्नाटक संगीत (गायन) चा पेपर 3 मार्च रोजी होणार होता, तर बारावीचा कायदेशीर अभ्यासाचा पेपर होणार होता. याशिवाय, इतर तारखांना होणाऱ्या परीक्षा जुन्या डेटशीटनुसारच होतील आणि त्यातकोणताही बदल करण्यात आलेला नाही.