राहिलेल्या वाहन धारकांनी येथे करा HSRP नंबर प्लेट डाउनलोड 

 

 

 

 

How to Get HSRP Number Plate: तुम्ही अजुनही तुमच्या जुन्या वाहनाला एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या नव्या मुदतीमुळे अजूनही नंबर प्लेट न बसवलेल्या लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ही नंबर प्लेट कशी बसवावी याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल तर येथे तुम्ही स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ शकता.

 

जुन्या वाहनांसाठी एचआसआरपी (HSRP) नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाची अंमलबजावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेली असली तरी अनेक वाहनधारकांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवलेली नाही. नोंदणी पाट्यांचा अपुरा पुरवठा आणि त्यामुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या नव्या मुदतीमुळे अजूनही नंबर प्लेट न बसवलेल्या लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची सुमारे 2 कोटी वाहने नोंदणीकृत आहेत, त्यापैकी आतापर्यंत केवळ 30 टक्के वाहनधारकांनीच एचएसआरपी बसवली आहे. हे प्रमाण खूपच कमी असल्याने परिवहन विभागाने ही मुदतवाढ दिली आहे. मात्र, ही शेवटची मुदतवाढ असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नोंदणी संपूर्ण प्रकिया

 

 

 

www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

एचएसआरपी ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा.

तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा)

यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही अधिकृत एचएसआरपी प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाल.

वाहनाशी संबंधित माहिती वाहन प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासह भरा.

एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी तुमच्या सोयीनुसार फिटमेंट केंद्र निवडा.

तुमच्या सोयीनुसार एचएसआरपी बसवण्याची तारीख आणि वेळ निवडा.

 

 

एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये

 

 

 

अॅल्युमिनियमपासून निर्मिती: एचएसआरपी प्लेट्स उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. त्यामुळे त्या मजबूत आणि टिकाऊ असतात.

क्रोमियम-आधारित होलोग्राम: या प्लेटवर एक क्रोमियम-आधारित होलोग्राम असतो आणि त्यावर अशोकचक्र छापलेले असते. हा होलोग्राम बनावटगिरी रोखण्यास मदत करतो.

युनिक लेझर-ब्रँडेड पिन कोड: प्रत्येक एचएसआरपी प्लेटवर एक युनिक 10-अंकी लेझर-ब्रँडेड पिन कोड असतो. हा कोड वाहनाची ओळख पटवण्यासाठी आणि त्याची सर्व माहिती केंद्रीय डेटाबेसमध्ये नोंदवण्यासाठी वापरला जातो.

टेम्पर-प्रूफ लॉक: एचएसआरपी प्लेट वाहनावर एकदा बसवल्यानंतर विशेष ‘स्नॅप लॉक’ने (Non-reusable Snap-Lock) लावली जाते. यामुळे ती सहजपणे.

 

 

 

अलीकडच्या काळात गाड्यांची सुरक्षा आणि ट्रॅकिंग सुधारण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. जर तुमच्या गाडीवर अजूनही जुनी नंबर प्लेट वापरली जात असेल, तर तुम्ही लवकरात लवकर एचएसआरपी लावून घ्यावी. तुम्ही घरबसल्या सहजपणे ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता. चला जाणून घेऊया की तुम्ही ऑनलाईन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची बुकिंग कशी करू शकता?

 

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काय आहे?

 

ही ॲल्युमिनियमपासून बनलेली विशेष नंबर प्लेट असते, ज्यात युनिक सिरीयल नंबर, होलोग्राम आणि एक लेझर-एनग्रेव्हड् कोड असतो. यासोबतच यावर कलर कोडेड स्टीकर सुद्धा लावलेला असतो, ज्यात वाहनाशी संबंधित महत्त्वाची माहिती असते, जसे की – इंधनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, नोंदणी तारीख इत्यादी. या प्लेटच्या मदतीने कार चोरी झाल्यास ती शोधण्यात बरीच मदत मिळते.

 

कोणकोणत्या वाहनांसाठी आहे आवश्यक?

 

हा नियम दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू करण्यात आला आहे, मग ते खाजगी असो वा व्यावसायिक. ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2019 पूर्वी झाले आहे, त्यांच्यासाठी एचएसआरपी लावणे आवश्यक आहे. नवीन गाड्यांमध्ये नंबर प्लेट आधीपासूनच लावून येते.

 

ऑनलाईन एचएसआरपी बुकिंग करण्याची पद्धत

 

अधिकृत वेबसाईटवर जा: एचएसआरपीच्या बुकिंगसाठी तुम्हाला वाहन निर्माता कंपनीच्या (ओईएम) अधिकृत वेबसाईटवर () जावे लागेल.

राज्य आणि वाहनाचा प्रकार निवडा: वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचे राज्य आणि नंतर वाहनाचा प्रकार (टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर) निवडावा लागेल.

गाडीची माहिती भरा: यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचा आरसी नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर यांसारखी माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. ही सर्व माहिती तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) वर दिलेली असते.

 

 

फिटमेंट लोकेशन आणि स्लॉट निवडा: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे

 

 

ती माहिती भरा आणि तारीख व वेळेचा स्लॉट निवडा.

पेमेंट करा: नंतर तुम्हाला शुल्काचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल. साधारणपणे दुचाकीसाठी 300 रुपये ते 400 रुपये आणि चारचाकीसाठी 500 रुपये ते 600 रुपयांपर्यंत चार्ज असतो.

बुकिंगची रिसिट मिळवा: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी पेमेंट केल्यानंतर रिसिट मिळेल, जी तुम्ही प्रिंट किंवा पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून घ्या. जेव्हा तुम्ही प्लेट 

Leave a Comment