(Maharashtra Cabinet Ministers) एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री (भाजपचे 17, शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 8) आणि 6 राज्यमंत्री (भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 1) यांचा समावेश आहे. दिनांक 21 डिसेंबर रोजी खातेवाटप जाहीर झाले असून, संपूर्ण यादी पाहादेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. यात फडणवीसांची गृह खातं स्वतःकडंच ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये रविवारी (15 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांनाही खाती वाटप करण्यात आली.
खातेवाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर आज (21 डिसेंबर) अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खतेवाटप जाहीर करण्यात आले.
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण