लडकी बहीण योजना बंद देवेंद्र फडणीस यांचा मोठा निर्णय 

 

 

 

 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाभार्थी महिलांचं ते सर्वात मोठं टेन्शन दूर, देवाभाऊंची मोठी घोषणाज्या कुटुंबाचं उत्पन्न हे कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे, लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्रमहाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात २०२४ मध्ये केली. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळतो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दारिद्य्र रेषेखालील पात्र महिलांना या योजनेमुळे मोठा फायदा झाला आहे.

 

 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक

 

 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहि‍णींना वेळोवेळी eKYC करावी लागते. राज्य सरकारने ईकेवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र अनेक महिलांची ईकेवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. आता अशा महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

 

काय आहे आदिती तटकरेंची पोस्ट?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !

 

 

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या

 

 

वाशिम जिल्ह्यात अनेक लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणे बंद झाल्याचं चित्र आहे. त्यासंबंधी तक्रार करायला गेलेल्या महिलांचा संताप पाहण्यास मिळाला होता. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला. यानंतर आता आदिती तटकरेंनी पोस्ट लिहून महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

 

 

काय आहे लाडकी बहीण योजना ?

 

 

महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत या महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होतात. महिलांना आर्थिक मदत मिळावी, त्यांचा घर खर्च चालावा या हेतूने ही रक्कम दिली जात आहे.

 

 

कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिंलासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, आधी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती, आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिल्याचे पैसे रखडले होते, मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या हाप्त्याचं वितरण लाभार्थी महिलांना करण्यात आलं आहे. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

 

दरम्यान राज्यात अशा देखील अनेक महिला आहेत, ज्या या योजनेसाठी पात्र नसून देखील त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांची नाव लाभार्थी यादीतून वगळण्यासाठी आता सरकारने या योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. या योजनेसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2025 होती, मात्र तारीख उलटून गेल्यानंतर देखील अनेक महिलांची केवायसी अद्यापही बाकी आहे, अशा महिलांना आता या योजनेचा लाभ बंद होणार असल्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्या महिलांची नावं यादीतून वगळली जाणार आहेत, तसेच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची नावं देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

 

 

 

सरकारने या योजनेसाठी केवायसी सुरू केल्यानंतर आणि आधी देखील काही महिलांची नाव या योजनेतून वगळण्यात आली होती. तेव्हापासून ही योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, त्यामुळे ही योजना खरच बंद होणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींना देखील पडला आहे, त्याचं उत्तर आज जालन्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment